🌿 आमचं गाव - खंडेराजुरी 🌿
🏰 गावाचा माहिती
खंडेराजुरी हे गांव मिरज – कवठेमहांकाळ रस्त्यावर असून मिरज १९ कि.मी अंतरावर तर कवठेमहांकाळ २० कि.मी.अंतरावर आहे. हे गांव बारमाही तालुका रस्त्याने जोडले आहे. गावाचे एकूण भौगोलिक क्षेत्र ३५५५ हे.२३ आर असून त्यामध्ये गावठाण क्षेत्र ९ हे. ६५ आर तसेच पडीक जमीन क्षेत्र ३६५ हे.७२ आर एवढे असून शेतीखाली एकूण क्षेत्र ३१८९ हे.५१ आर एवढे आहे. गायरान क्षेत्र ६२ हे.४२ आर एवढे आहे. गावालगत दोन ओढे आहेत.सदर ओढयावर जागोजागी बंधारे बांधले आहेत. गावातील बहुतेक नागरिकांचा व्यवसाय शेती व शेती आधारित आहे. गावातील शेतीत मुख्यपिके ऊस,कापूस,तूर,सोयाबीन द्राक्षे,मुग,ज्वारी,हरभरा इ.पिके मोठया प्रमाणात घेतली जातात. गावात जि.प.ची इयत्ता १ ते ७ वी पर्यंत शाळा तसेच इ १० वी पर्यंत माध्यमिक हायस्कूल आहे. सन २०११ च्या जनगणनेनुसार गावात एकूण कुटुंब संख्या १११३ असून एकूण लोकसंख्या ५५०६ आहे. यामध्ये पुरुष २८४६ तर स्त्रिया २६६० आहेत. .
🏢 ग्रामपंचायत माहिती
- सरपंच:सौ.शुभांगी नामदेव चव्हाण
- उपसरपंच:श्री.वास्कर दाजी शिंदे
- ग्रामसेवक:श्री.विनोद रामचंद्र खांडेकर
- एकूण लोकसंख्या(२०११नुसार):५५०६
🏫 शाळा आणि संस्था
- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खंडेराजुरी
- खंडेराजुरी हायस्कूल
- महिला बचतगट संस्था-४०
📸 गाव फोटो गॅलरी
🎬 गावाचे व्हिडिओ
📞 संपर्क
ग्रामपंचायत कार्यालय,खंडेराजुरी
ईमेल: info@khanderajuri.in
फोन: 02332265525